ऋषि विद्या एज्युकेशनल स्कूलने जालन्यातील एका उत्तम सी. बी. एस. ई. शाळेचा शोध पूर्ण होतो. येथे आपल्या पाल्याचा प्रवेश घेऊन आपल्याला निश्चितच निश्चिंत होता येते. माझ्या मुली प्रिया आणि प्रेरणा या शाळेच्या विद्यार्थीनी आहेत. अगदी छोट्या वर्गापासून आणि लहानशा जागेवर सुरू झालेली ही शाळा आज स्वतः च्या प्रशस्त जागेवर वृध्दींगत होत आहे. येथे प्रत्येक विद्यार्थ्याकडे काळजीपूर्वक लक्ष दिले जाते. प्रत्येक विद्यार्थ्याला समजलंच पाहिजे याची काळजी घेण्यात येते. शिक्षक पालकांच्या बैठकीचे आयोजन करुन विद्यार्थाच्या प्रगती विषयी तसेच अडचणी संदर्भात चर्चा केली जाते. शिवाय पालकांना आपल्या पाल्या विषयी शिक्षकांना आणि प्रशासनास कधीही भेटता येते. शाळेत मोठी प्रयोगशाळा असून विद्यार्थी येथे स्वतः प्रयोग करतात. संगणक कक्षात स्वतः संगणक हाताळतात. आधुनिक तंत्रज्ञान, इंटरनेट, ऑनलाईन वर्ग या बाबी शाळेचा अविभाज्य भाग आहेत. येथील वाचनालय समृद्ध आहे. उत्कृष्ट दर्जाची पुस्तके विद्यार्थ्यांना येथे वाचायला मिळतात. विविध स्पर्धा परीक्षा, क्रीडा प्रकार आणि सर्व स्पर्धांची तयारी खूप चांगल्या प्रकारे करून घेतली जाते. संगीत, विविध आणि उत्तम सांस्कृतिक कार्यक्रम घेतले जातात. प्रत्येक क्षेत्रातील महत्त्वाच्या व्यक्तींना ऐकण्याची संधी विद्यार्थ्यांना प्राप्त करून दिली जाते. शिक्षणाबरोबरच बालकांचा सर्वांगीण विकास कसा होईल हे येथे जाणीवपूर्वक पाहिले जाते. बौद्धिक , शारीरिक, मानसिक आणि सामाजिक विकास साधण्याचे कार्य शाळेकडून नित्य होत असते. प्रत्येक बालकांच्या कला गुणांना येथे चालना दिली जाते. ही संधीच बालकांच्या पुढील आयुष्यासाठी महत्वाची असते. शाळेत विद्यार्थ्यांना उत्कृष्ट आणि परिपूर्ण आहार दिला जातो. जेवनात रोज विविधता असते. प्रत्येक पदार्थ प्रत्येक बालकांस आवडीने आणि आईच्या ममतेने खाऊ घातला जातो. यामुळे बालकांची प्रकृती उत्तम असते.
शाळेचे प्रशासन खरंच तपस्वी आहे. शिक्षक वृंद विद्वान तर सर्वच कर्मचारी वर्ग सेवाभावी आहे. शिक्षणाचा व्यवसाय करण्यासाठी नाही तर ज्ञानाचे नंदनवन करण्यासाठी झटणारे हे ज्ञानयोगी आहेत.

Diana Richards

manager